शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

Updated: Jan 12, 2015, 11:28 PM IST
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव title=

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

यात शिवाजी पार्क परिसरातील दोन, लोअर परळ आणि माटुंग्यातील दोन जागा तसंच बीकेसीमधील एका जागेचा प्रस्ताव देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीआधी यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

२३ जानेवारीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.