उद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. 

Updated: Jan 12, 2015, 11:38 PM IST
उद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद! title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. 

अभिनयाच्या या शहेनशहानं, उद्धव यांच्या कॅमेरा लेन्स वर्कची यावेळी मुक्तकंठानं प्रशंसा केली. 
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे यांनी फोटोप्रदर्शन आयोजित केलं आहे. आज या प्रदर्शनाला महानायक अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांनीही हजेरी लावली.
 
उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन सात ते १३ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. या प्रदर्शनातील फोटोंच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याच उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.
 
यापूर्वी या प्रदर्शनाला राज ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव यांच्यासह सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी भेट दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.