24taas

अरेरे! टिव्ही पाहू न दिल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या

टिव्ही बघताना वडील रागावल्यानं बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन मुलीनं आज संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे. 

Jan 15, 2015, 08:48 PM IST

आयफोन ६ ला टक्कर देण्यासाठी Miनोट, Miनोट प्रो लॉन्च

बीजिंगमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये चायनीज स्मार्टफोन कंपनी श्याओमीनं आज आपल्या फ्लॅगशिप फॅबलेट Miनोट लॉन्च केलाय. कंपनीचे सीईओ ली जून यांनी सांगितलं की, हा फोन अॅपल आयफोन ६ प्लसला टक्कर देईल. टॅबलेटचे दोन मॉडेल लॉन्च केले गेलेत. एक नोट आणि दुसरं नोट प्रो.

Jan 15, 2015, 08:10 PM IST

सावधान! नोटांना थुंकी लावून मोजू नका, नाहीतर व्हाल आजारी

आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक लोक भेटतात. अनेक नोटा आपल्या हातातून जातात. अनेकांना बोटांना थुंकी लावून पैसे मोजायची सवय असते. जर कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्तीनं नोट हाताळली आणि तीच नोट तुमच्या हाती आली तर...

Jan 15, 2015, 07:31 PM IST

हर्षी गावातील ही व्यथा.. मुला-मुलींचं लग्न कसं होणार?

दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यासोबत आता अनेक सामाजिक समस्या सुद्धा ग्रामीण भागात निर्माण होतंय. त्यात एक मोठी समस्या आहे लग्नाची.. मुलींच्या लग्नाला पैसै नाहीतच त्यासोबत आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासही लोक धजावत नाहीये. 

Jan 15, 2015, 06:37 PM IST

मुंबईच्या धारावीच्या मुलींनी बनवले कमालीचे अॅप्स

धारावीत राहणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या या मुलींनी भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी... चार भिंतींचा आसरा त्याला घर असं नाव.... इथला प्रत्येक दिवस संघर्षाचा.... पण संघर्ष करता करता जगणं सुंदर कसं करता येईल.... हे या बारा तेरा वर्षाच्या मुलींकडून शिकावं.... जिथं शिक्षणासाठीही बरंच झगडावं लागतं. त्याच वातावरणात राहणाऱ्या या मुलींनी मोबाईल अॅप्स तयार केलीयत. 

Jan 15, 2015, 05:11 PM IST

किरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश!

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवस मोजणं आता सुरू झालंय. दिल्लीची लढाई आप आणि भाजपमध्ये होणार हे आता जवळपास सिद्धच झालंय.

Jan 15, 2015, 04:38 PM IST

तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट

तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट

Jan 15, 2015, 10:08 AM IST

तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत ४० हजारांची घट

हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई मेट्रोचे तिकीटदर ९ जानेवारीपासून वाढविण्यात आले. मात्र याचा परिणाम आता प्रवाशांच्या संख्येवर होतोय. तिकीटदरवाढल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत तब्बल ४० हजारांनी घट झालीय.

Jan 14, 2015, 10:25 PM IST