पवारांची मध्यस्थी कामी; कचऱ्यावर तोडगा
पुण्यातल्या कचऱ्याच्या प्रश्नावर तुर्तास तोडगा निघालाय. पवारांनी या प्रश्नावर केलेली मध्यस्थी यशस्वी झालीय.
Feb 15, 2014, 11:49 PM ISTपुण्यातील कचराप्रश्न पेटला, शरद पवार मैदानात
पुण्यातील कचरा कोंडीवर अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नावरून आता राजकीय पक्षांची स्टंटबाजी सुरु झालीय..सगळेच पक्ष कचऱ्याच्या प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत. दरम्यान, शरद पवार सध्या पुण्यात आहेत. आज संध्याकाळी त्यांनी त्यांनी अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बोलावलीये.. सर्कीट हाऊसमध्ये पाच वाजता ही बैठक होतीये. गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या या कचरा प्रश्नावर पवारांच्या मध्यस्थीनंतर तरी आता तोडगा निघणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 15, 2014, 03:45 PM ISTशरद पवार हेच आपले नेते - सुशीलकुमार शिंदे
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
Feb 11, 2014, 10:59 AM ISTपवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.
Feb 9, 2014, 11:21 PM ISTमोदींनाच भेटलो कुणा पाकिस्तानीला नाही; पवारांची कबुली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं खुद्द शरद पवार यांनीच अखेर मान्य केलंय. ठाण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही कबुली दिलीय.
Feb 9, 2014, 10:45 PM ISTपाकिस्तानात जाऊन तर मी कुणाला भेटलो नाही ना? - पवार
मी मुख्यमंत्र्यांना भेटलो ना?, चीन किंवा पाकिस्तानात तर जाऊन कुणाला भेटलो नाही ना?, असा सवाल शरद पवार यांनी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर बोलतांना केला आहे.
Feb 9, 2014, 12:51 PM ISTपवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पराभवाची आठवण करून दिली आहे. शरद पवार यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली होती, या टीकेला हे चोख उत्तर असल्याचं सांगण्यात येतंय.
Feb 2, 2014, 04:00 PM IST`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`
देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Feb 2, 2014, 02:37 PM ISTउदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!
सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.
Feb 1, 2014, 08:58 PM ISTशरद पवारांची सोबत अ...ह... `असंगाशी संग नको`!
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. `असंगाशी संग नको` या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडलीय.
Feb 1, 2014, 12:21 PM ISTशरद पवारांचा राजकीय खेळ कुणाला कळला?
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचा पराभव झाला, परंतु भाजपप्रणित एनडीएलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर...? अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय चाल महत्त्वाची ठरणार आहे.
Feb 1, 2014, 12:02 AM ISTराजकारणात पवारांचा `खंजीर` आजही `धारदार`
एक धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असणारे शरद पवार, हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटले, अशी बातमी एका वृत्तपत्रात राजकारणात स्पष्टीकरणांची खडाखडी सुरू झाली.
Jan 31, 2014, 05:25 PM ISTपवारांच्या `गंडा`वर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
ज्यांनी आयुष्यभर लोकांना गंडवलं त्या शरद पवार यांना गंडा आणि शिवबंधनातला फरक काय कळणार, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. मुंबईत एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Jan 26, 2014, 10:28 AM ISTपवारांची संपत्ती ५ वर्षात ४ पट वाढली
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संपत्तीत ५ वर्षात एक नाही, दोन नाही, तर चार पटींनी वाढ झाली आहे. शरद पवारांनी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली.
Jan 24, 2014, 09:19 PM ISTतटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.
Jan 17, 2014, 07:57 AM IST