शरद पवारांकडून कधी मोदींची खिल्ली तर कधी पाठराखण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत, हे सांगणं अवघड झालंय. कारण कधी मोदींची गुपचूप भेट घेणारे, त्यांची स्तुती करणारे पवार आता त्यांच्यावर हल्ले चढवतायत.
Mar 26, 2014, 09:39 AM ISTकिरीट सौमय्यांची शरद पवारांच्या विरोधात तक्रार
महाराष्ट्र पोलीस मुख्यालयामध्ये शरद पवार यांच्या विरोधात किरीट सौमय्या यांनी तक्रार दिली आहे. स्पेशल डीजी देवेन भारती यांची सोमयांनी भेट घेतली.
Mar 24, 2014, 06:30 PM ISTपवारांच्या वक्तव्यावर, उद्धव ठाकरेंची तोफ
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या दोनदा मतदान करा, या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तोफ डागलीय.
Mar 24, 2014, 04:34 PM ISTदोनदा मतदानाबाबत शरद पवार यांची सारवासारव
गावाकडे मतदान केल्यानंतर शाई पुसून मुंबईतही करा मतदान, दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला खरा. मात्र हा सल्ला त्यांच्या अंगाशी आल्यानंतर लगेच सावरासावर केली. दरम्यान टीकेनंतर पवारांनी आपल्या विधानावर सारवासारव केलेय. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेय.
Mar 23, 2014, 07:40 PM ISTबोटावरची शाई पुसा, दोनदा मतदान करा- पवारांचा सल्ला
दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला शरद पवारांनी दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. "आधी साताऱ्याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा", असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय. बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले.
Mar 23, 2014, 03:30 PM ISTशरद पवारांची सेना नेतृत्वावर टीका
ज्या लोकांना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यांना शिवसेनेने तिकीट दिले असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिर्डी मधील सेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीवरून भाजप सेनेवर टीका केलीये.
Mar 23, 2014, 08:51 AM ISTउद्धव ठाकरे बरसले; पवार, राज यांच्यावर हल्लाबोल
शिवसेना हा ओरिजिनल म्हणजेच नवनिर्मित पक्ष आहे. तर राष्ट्रवादी हा विकाऊ आणि गद्दारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे काय मिळते काय, यावर त्यांचा डोळा असतो, अशी जोरदार टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केली. याचवेऴी शिवसेना-भाजप युती सर्व जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला.
Mar 22, 2014, 03:51 PM ISTगारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार
गारपीटग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्यालाच प्राधान्य असल्याचं कृषीमंत्री शरद पवारांनी सांगितलंय. मात्र मदत करण्यामध्ये मुख्य अडचण आचारसंहितेचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2014, 04:27 PM ISTपवार कन्येकडूनही मोदींना क्लीनचिट...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्या आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनीही नरेंद्र मोदींना क्लीनचिट देऊन टाकलीय.
Mar 18, 2014, 11:16 AM ISTराहुल नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट!
शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.
Mar 16, 2014, 03:49 PM ISTपवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.
Mar 10, 2014, 08:44 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्यूला बदलला!
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बदलला गेलाय. आता काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी काँग्रेस २१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे जात हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडलीय.
Mar 8, 2014, 08:02 PM ISTशरद पवारांचा गौप्यस्फोट, माझं एेकलं असतं तर...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.
Mar 1, 2014, 08:56 AM ISTमोदींना टोला, गुजरातमध्ये खून कसे पडलेत - शरद पवार
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता टीका केलीय़. शेजारच्या राज्यातले मुख्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतायत, मात्र याच राज्यात खून कसे पडले आहेत याचं चित्र लोकांसमोर असल्याची टीका पवारांनी मोदी यांचं नाव न घेता केली आहे.
Feb 22, 2014, 04:41 PM ISTहे आहेत राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज आणि उद्या मुंबईत पुन्हा बैठक होत आहे. लोकसभेचे बहुतांश उमेदवार आधीच निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादीला अजून चार ते पाच ठिकाणी उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. त्यासाठी स्वतः शरद पवार दोन दिवस मुंबईत बैठक घेत असून या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Feb 22, 2014, 03:51 PM IST