राजकारणात पवारांचा `खंजीर` आजही `धारदार`

एक धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असणारे शरद पवार, हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटले, अशी बातमी एका वृत्तपत्रात राजकारणात स्पष्टीकरणांची खडाखडी सुरू झाली.

Updated: Jan 31, 2014, 08:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एक धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असणारे शरद पवार, हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटले, अशी बातमी एका वृत्तपत्रात राजकारणात स्पष्टीकरणांची खडाखडी सुरू झाली.
मात्र राज्याच्या राजकारणात ज्यांचा खंजीर `धारदार` आहे, अशा शरद पवारांनी हे वृत्त `निराधार` आणि खोळसाळपणाचा असल्याचं स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी हा पक्ष माध्यमं आणि विरोधकांच्या टीका टीप्पणीकडे बहुदा जबाबदारपणे कधी पाहत नाही.
मात्र शरद पवार जातीयवादी पक्षांशी कधी हात मिळवणी करणार नाहीत, असं काळजीपूर्वक स्पष्टीकरण यावेळी राष्ट्रवादीने दिलं आहे. शरद पवारांनीही आपल्या ट्वीटरवरून हे वृत्त सपशेल फेटाळून लावलं आहे.
`धारदार` खंजीरवाल्यांची `निराधार` गोष्ट
शरद पवार हे ७ ते २० जानेवारी दरम्यान बारामतीत असल्याची माहिती राष्ट्रवादी नेत्यांनी दिलीय. यामुळे शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची बातमीच निराधार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्याचं म्हणणं आहे.
या काळात पवार हे बारामतीत असल्याचंही राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपनेही अशी भेट झालीच नसल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार जातीयवादी पक्षांशी जुळवून घेतील, असं कुणालाही वाटत नाही, मग हे वृत्त एवढं विश्वसनीय का वाटलं, अशी चर्चा आहे. मात्र निवडणुकाजवळ असल्याने राजकारणात सुंदोपसुंदी अपेक्षित असते. काहींना याला काँग्रेसवरील हे दबावतंत्र असल्याचंही म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात दंगलीवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला साक्ष ठेऊन, नरेंद्र मोदी यांनी क्लिन चीट दिल्यानंतर पवार मोदींशी जुळवून घेतील, अशी शक्यताही सर्वांना सत्य वाटणारीच आहे.
पवारांचा `खंजीर` आजही `धारदार`
पवारांविषयी अशा शक्यता अधिक सबळ वाटण्यासाठी राज्यातील राजकारणात कधीही न विसरता येणारं, वसंतदादा पाटलांचं एक वाक्य काफी आहे.
वसंतदादा पाटील १९७८ सालच्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुखमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी पवारांनी मात्र काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून, विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर `पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला` अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतदादा पाटलांनी व्यक्त केली होती.
वसंतदादा पाटलांची ही प्रतिक्रिया आजही राजकीय पक्षांना आणि विश्लेषकांना घायाळ करते. म्हणून शरद पवारांचा राजकीय खंजीर आजही धारदार आहे, अशी संशयाची पाल आजही राजकारणातलं `टायमिंग` पाहून डोक्यात `टिक` `टिक` वाजत असते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.