पवारांची संपत्ती ५ वर्षात ४ पट वाढली

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संपत्तीत ५ वर्षात एक नाही, दोन नाही, तर चार पटींनी वाढ झाली आहे. शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली.

Updated: Jan 24, 2014, 09:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संपत्तीत ५ वर्षात एक नाही, दोन नाही, तर चार पटींनी वाढ झाली आहे. शरद पवारांनी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली.
शरद पवार यांची संपत्ती दहा वर्षात जवळजवळ दहापटीनं वाढली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी आज शरद पवार आणि माजिद मेमन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रतिज्ञापत्रानुसार पवारांच्या संपत्तीचा आकडा
२००४ साली , ३ कोटी २७ लाख १७ हजार, २००९ साली, ८ कोटी ७२ लाख ३८ हजार वर्ष, २०१४ साली, ३२ कोटी ९० लाख वर्ष
शरद पवारांनी २००९ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ८ कोटी ७२ एवढी संपती नमूद केली. ही संपत्ती २००४ च्या निवडणुकीच्या वेळी ३ कोटी २७ लाख रूपये दाखवण्यात आली होती. यानंतर आज शरद पवारांनी आपली संपत्ती ३२ कोटी ९० लाख रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.