www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या कचऱ्याच्या प्रश्नावर तुर्तास तोडगा निघालाय. पवारांनी या प्रश्नावर केलेली मध्यस्थी यशस्वी झालीय.
शनिवारी, पवारांनी उरुळीचे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतली. पुण्यातील कचऱ्याप्रश्नी एक कार्यक्रम आखून त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. याशिवाय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेली यंत्रणा वापरणं आवश्यक असल्याचा सूरही या बैठकीत उमटला. त्यासाठी येत्या १९ तारखेला पुन्हा एकदा नगरसेवक, अधिकारी, आणि लोकप्रतिनिघी यांच्यासोबत बैठक घेऊन या कार्यक्रमविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असं पवारांनी म्हटलंय.
यानंतर फुरसुंगी ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या गावात यायला केलेली बंदी तात्पुरती मागे घेतलीय. यामुळे शहरातील सर्व कच-याचा प्रश्न तात्पुरता तरी सुटलाय.
`झी २४ तास`चं आवाहन
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याची सध्या कचराकुंडी झालीय. जागोजागी कच-याचे ढीग लागल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही पुणेकर असाल आणि तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या आसपास कच-याचा डोंगर उभा असेल तर आम्हाला कळवा. तुम्ही आम्हाला कच-याचा फोटो पाठवा zee24taasonline@gmail.com या ई-मेल आयडीवर... आम्ही मांडू तुमची कचऱ्याची समस्या झी 24 तासवर...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.