वजन

वजन कमी केल्याने येते चांगली झोप

 ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

Jun 26, 2014, 03:59 PM IST

जेवणाचं व्यसन ठरू शकतं धोकादायक!

तुम्ही पोट भरून खाल्ल्यानंतरही तुम्हाला पुन्हा काही तरी खाण्याची इच्छा होते? जर तुमचं उत्तर हो असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या... कारण, या खाण्याच्या ‘व्यसना’मुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता बळावते.

Jun 24, 2014, 05:07 PM IST

19 वर्षांच्या मुलीची उंची 78 सेंमी, वजन अवघं 10 किलो

वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण बंगाल राज्यातील मीरापूर येथील कस्बे गावातील अजिफा शेख हीचं

वय 19 असून तिची उंची फक्त 78 सेंटीमीटर तर वजन 10 किलोच आहे. ती आपल्या आईच्या

खुशीत असते, तिला पाहिले तर ती दोन वर्षांची मुलगी वाटते. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, ती

शाळेत ही जाते, लहान-लहान मुलांसोबत देखील खेळते.

Jun 17, 2014, 08:09 PM IST

सावधान, बेडरुममधील प्रखर प्रकाशामुळे वाढतं वजन

सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.

Jun 13, 2014, 01:39 PM IST

वजन घटविण्यासाठी लिंबू पाणी प्या

तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता आहे का? तुमचे वजन कमी करायचे आहे. तर मग लिंबू पाणी प्या. रोज सकाळी लिंबू पाणी प्या. या पाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाणे वाटते. तसेच त्याचे फायदे आहेत.

Jun 10, 2014, 03:33 PM IST

कोवळं ऊन नियंत्रित करते तुमचं वजन

कोवळ्या सूर्य किरणांने `ड` जीवनसत्व मिळतं हे तुम्हांला माहीत असेल. मात्र एवढचं नाही तर सकाळी कोवळी किरणं वजनावरही नियंत्रण ठेवतात. अभ्यासकांच्या मते, तुम्ही जर दिवसानंतर ऊन घेत असाल, तर ते तुमच्या शरीरातील द्रव्यमान कमी करतं.

Apr 5, 2014, 01:54 PM IST

वजन वाढण्याची कारणं आणि कमी करण्याचे उपाय

आपल्या शरीरात जेव्हा चरबी जास्त साठत जाते, त्यावेळी व्यक्ती लठ्‍ठ होते, आपल्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले म्हणजे लठ्‍ठपणा दिसतो.

Mar 24, 2014, 04:14 PM IST

वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सोप्या गोष्टी...

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वत:ला खूप त्रास दिला असेल... आणि काही दिवसांनंतर कंटाळून आपल्या व्रताला राम-राम म्हटलं असेल... पण, तुम्हाला स्वत:ला त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही. कारण...

Jan 12, 2014, 05:37 PM IST

जेवण टाळता? मग वजन वाढणारच...

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Dec 15, 2013, 07:58 PM IST

हसत राहा आणि वजन कमी करा!

वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.

Nov 30, 2013, 08:11 PM IST

लग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?

जास्त वजन असल्यामुळे अनेक लोकांना जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन वाढल्यामुळे तरूणांना लग्नाच्या वेळी अडचणी भेडसावतात. विशेष तज्ज्ञांच्या मते, लग्न समारंभात सर्वत्र गोड खाऊनदेखील वजन कमी करता येते. त्यामुळे लग्नकार्यात बिनधास ‘मिठाई’ खा...

Nov 27, 2013, 07:00 PM IST

वजन कमी होत नाही, काय कराल?

काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?

Sep 4, 2013, 02:31 PM IST

वजन घटवा...सोने मिळवा

वजन घटवा...सोने मिळवा. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरं आहे आता तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही तर उलटं आता तुम्हालाच मिळणार आहे सोनं.

Jul 19, 2013, 02:48 PM IST

कमबॅकसाठी अॅशचा वजनावर जोर!

ऐश्वर्या राय-बच्चन आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यासाठीच तिनं ध्यास घेतलाय वजन कमी करण्याचा...

Jan 5, 2013, 07:42 AM IST

घ्या आहार थंडगार, कमी करा शरीराचा भार

वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय डॉक्टरांनी शोधून काढला आहे. आणि हा उपाय तुमच्या फ्रिजमध्ये आहे. होय. फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार फ्रोझन आहार खाल्ल्यास जाडेपणा कमी होतो, असं डॉक्टरांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे.

Nov 7, 2012, 05:31 PM IST