जेवण टाळता? मग वजन वाढणारच...

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Updated: Dec 15, 2013, 08:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
कमी आहार हा तुम्हाच्या शरीरासाठी चांगले संकेत नसून हानीकारक आहे. त्यामुळं तुम्हाच्या शरीराच्या चरबीत वाढ होते आणि तुमचं वजन कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते. कमी जेवण केल्यामुळं शरीराला आवश्यक पोषकतत्त्वं मिळत नाहीत आणि त्यामुळं वजन वाढतं.
अनेक लोक हे वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणं टाळतात. त्यामुळं शरीराला आवश्यक असेल तेवढी पोषकतत्त्वं मिळत नाहीत. परिणामी चयापचयाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. तसंच चयापचय ही क्रीया शरीराला दिवसभरात ताजंतवानं राहण्यासाठी मदत करते. आपण वेळेवर जेवण केल्यास चयापचय ही प्रक्रिया सुरळीत चालते. परंतु तुम्ही जेवण टाळल्यास चयापचय या प्रकियेत अनेक अडथळे निर्माण होतात आणि ही प्रक्रिया बिघडते आणि त्यामुळम शरीरात चरबी साठण्यास सुरुवात होते. ही चरबी साठल्यानंतर तुमचं वजन वाढतं.
जेवन टाळल्यामुळं शरीरातील रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखील परिणाम होतो. जेवन न करता दिवसभर काम करत असल्यामुळं शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी शरीरातील साखर ही रक्तप्रवाहात मिसळते, त्यामुळं चयापचय दरम्यान तुम्ही खालेल्या अन्नाच्या काही भागचं चरबीत रुपांतर होतं आणि ते शरीरात साठवलं जातं. नियमित योग्य वेळी जेवन न केल्यामुळं तुम्हाला पुढच्या जीवनात वजन वाढ होऊ शकतं आणि शरीरातील चरबी वाढल्यामुळं साखरेची ही पातळी वाढते. त्यामुळं मधुमेहासारख्या आजारांना तोड द्यावं लागू शकतं.
त्यामुळं या आजारांवर आणि वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य वेळी जेवण करणं हे महत्त्वाचं आहे. तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी रोज व्यायाम करणंही गरजेचं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.