www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.
आपल्या बेडरुममध्ये जास्त प्रकाश असल्यास वजनात वाढ होते, असे लंडन इन्स्टिटयूट आणि कॅन्सर रिसर्चचे प्राध्यापक अँटनी स्वेर्डलॉ यांनी सांगितलं. संशोधन करत असताना प्रकाश आणि लठ्ठपणा हे वजन वाढण्यामागे मुख्य कारण आहे, असे लक्षात आले. तेव्हा 40 वर्षे वयोगटातील 113,000 महिलांचा या अभ्यास करण्यात आला. त्यावरुन प्रखर प्रकाशामुळे वजन वाढत असल्याचे स्पष्ट झाले.
स्वेर्डलॉच्या मते, शरीरातील पचन क्रिया प्रभावित होत असताना झोपताना, उठताना प्रकाशाचा परिणाम होत असतो, असे सिद्ध झालेत. त्यामुळे अधिक अभ्यास करण्यासाठी प्राण्याची निवड करण्यात आली. या संशोधनाचा प्राण्यांवर प्रयोग केल्यानंतर सिरकॅडियन लय आणि पचन क्रिया यांचा प्रकाशाशी संबंध येतो असे ब्रिटेनच्या ब्रेकथ्रू ब्रेस्ट कॅन्सर संधोधक मॅथ्यू लॅम यांनी सांगितलं.
हे संशोधन अमेरिकन जनरल ऑफ एपिडेमिलॉजीत प्रकाशित झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.