हसत राहा आणि वजन कमी करा!

वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 30, 2013, 08:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
याउलट जास्त हसल्यामुळं वजन कमी होतं. हसण्याच्या उकळी बरोबरच पोटात हालचाल सुरु होते. त्यामुळं वजन घटण्यास मदत होते. असं काही तज्ज्ञांचं मत आहे म्हणून सतत हसत राहणं गरजेचं आहे. अनेक लोक वजन वाढीला कंटाळून ते कमी करण्यासाठी व्यायाम शाळेत जाणं सुरू करतात आणि खडतर परिश्रम घेतात. पण तरी सुद्धा वजन काही कमी होत नाही.
त्यामुळं अनेक लोक हे व्यायाम शाळेत न जाणंच पसंत करतात. त्याचबरोबर बारीक होण्यासाठी आनंदी असणं देखील गरजेच आहे. त्याचबरोबर रोजच्या रोज हास्यामुळं रोगप्रतिबंधक शक्ती वाढते आणि ब्लडप्रेशर देखील समतोलात राहते.
हसल्यामुळं पोट हलत असल्यानं एकप्रकारे पोटाचा सर्वोत्तम व्यायाम आहे. रोजच्या रोज हसल्यामुळं चांगल्या प्रमाणात वजन घटू शकते. तसंच हसण्याबरोबरच स्वत: ही आनंदी राहणं देखील महत्त्वाचं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.