राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी

आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत. 

Oct 12, 2014, 07:40 PM IST

१०० दिवसांत काळापैसा आणण्याचं आश्वासन कुठे गेलं?- अजित पवार

मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय.  ते पुण्यात बोलत होते.

Oct 12, 2014, 06:13 PM IST

UPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे

 आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.

Oct 12, 2014, 05:38 PM IST

बाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी

बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय. 

Oct 5, 2014, 01:03 PM IST

'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत. 

Oct 2, 2014, 02:02 PM IST

काँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी

काँग्रेसमुळं आघाडी तुटलेली नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलंय. माझ्यामुळं किंवा राहुल गांधींमुळं आघाडी तुटलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

Sep 30, 2014, 09:36 PM IST