देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र, 'या विजयाचे खरे शिल्पकार....'

Devendra Fadanvis Letter:   तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे ते आपल्या पत्रात म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2024, 07:39 PM IST
देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र, 'या विजयाचे खरे शिल्पकार....' title=
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis Letter: विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे महायुती लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिला आहे. यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला पत्र लिहिले आहे. काय म्हणाले देवेंद्रे फडणवीस? जाणून घेऊया. 

महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे ते आपल्या पत्रात म्हणाले. 

मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणिपंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे फडणवीस आपल्यास पत्रात लिहितात. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा आभार मानतो, असे फडणवीसांनी आपल्या पत्रात लिहिले आहे..

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'

आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..'

भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? असं फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, "याबातीत अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपद हे कोणत्याही निकषावर नाही, तर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आमचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल. याबाबत कोणताही वाद नाही".एकाप्रकारे लोकांनी आपला निर्णय दिला आहे. लोकांनी एकनाथ शिंदेंना खरी शिवसेना म्हणून स्विकरलं आहे. आणि मूळ राष्ट्रवादी अजित पवारांची ठरली आहे असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. "आजच्या निकालाने संपूर्ण महाराष्ट्र नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोदींनी 'एक है तो सेफ है' चा नारा दिला होता. महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा नारा यशस्वी केला आहे. आमच्या लाडक्या बहिणींचे विशेष आभार आहेत. ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहेत," अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे ते म्हणाले, "जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता, त्याविरोधात लढणाऱ्या संघटनांचा हा विजय आहे. जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला होता, त्याच्याविरोधात जनजागृती करणारे विविध पंथांचे संत त्यांचाही हा विजय आहे. गावात, पाड्यात, वाडीत, वस्तीत जाऊन प्रचार केला त्या सर्वांचा हा विजय आहे. महायुतीचे लाखो कार्यकर्ते त्यांचाही विजय आहे. आमच्या एकजुटीचा हा विजय आहे. यानिमित्ताने अमित शाह यांचे मी आभार मानतो, ज्यांनी महाराष्ट्रात येऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं".

एकही जागा न जिंकलेल्या राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया