१०० दिवसांत काळापैसा आणण्याचं आश्वासन कुठे गेलं?- अजित पवार

मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय.  ते पुण्यात बोलत होते.

Updated: Oct 12, 2014, 06:13 PM IST
१०० दिवसांत काळापैसा आणण्याचं आश्वासन कुठे गेलं?- अजित पवार title=

पुणे: मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय.  ते पुण्यात बोलत होते.

तसंच भाजपकडे जाहिरातींसाठी इतका पैसा आला कुठून. भाजपच्या जाहिरात खर्चाची माहिती आरटीआयमध्ये मिळायला हवी, असंही अजित पवार म्हणाले. 

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, या भाजपच्या जाहिरातीवरून अजित पवारांची टीका. भाजपच्या जाहिरात खोट्या, अजित पवारांचा भाजपवर घणाघात. 

तर काका शरद पवारांनी आपल्या काळाचौकी इथल्या सभेत मोदींवर शरसंधान साधलंय. मोदींनी आपल्या मंत्रालयाची माहिती काढावी. गुजरात- महाराष्ट्राचा आलेख पाहावा. महाराष्ट्र कुठे आहे त्यांच्या ज्ञानात त्यानं भर पडेल. महाराष्ट्र गुजरातच्या पुढेच आहे. भाजपतर्फे महाराष्ट्राचं बेसून चित्र मांडलं जातंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.