राष्ट्रवादी काँग्रेस

जुळलं तर जुळलं! उद्धव ठाकरेंचं अजूनही तळ्यात-मळ्यात!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार फक्त सरकार पाडू शकतात, बनवू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Nov 10, 2014, 07:25 PM IST

मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले. 

Nov 10, 2014, 04:07 PM IST

उद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा, चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय. 

Nov 9, 2014, 07:52 PM IST

दादांचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं!

दोन स्थानिक तुल्यबळ नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, दोघांना गोंजारायचं आणि गरज पडेल तेव्हा एकाला दूर सारायचं हे अजित पवारांच्या राजकारणाचं सूत्र… पण त्यांचं हेच सूत्र त्यांच्यावर उलटलं आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीला पर्यायानं दादांना शहरातलं त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावं लागतंय.

Oct 27, 2014, 09:13 PM IST

देशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह

दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय. 

Oct 19, 2014, 05:40 PM IST

दिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Oct 19, 2014, 06:32 AM IST

पटेलांच्या 'टिवटिव'नं उभे राहिले भल्याभल्यांचे कान!

१९ ऑक्टोबर २०१४ ला सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आघाड्या आणि युतीच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय... आणि आता त्याला हवा दिलीय राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी...

Oct 16, 2014, 02:19 PM IST

प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी

युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती. 

Oct 13, 2014, 07:21 PM IST