काँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी

काँग्रेसमुळं आघाडी तुटलेली नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलंय. माझ्यामुळं किंवा राहुल गांधींमुळं आघाडी तुटलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

Updated: Sep 30, 2014, 09:36 PM IST
काँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी title=

नवी दिल्ली: काँग्रेसमुळं आघाडी तुटलेली नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलंय. माझ्यामुळं किंवा राहुल गांधींमुळं आघाडी तुटलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी तुटण्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं खापर फोडलं होतं. मात्र सोनिया गांधींनी या आरोपाचा इन्कार केलाय.

जम्मूच्या दौऱ्यावर असताना सोनिया पत्रकारांशी बोलत होत्या. पूरग्रस्तांच्या चौकशीसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोन दिवस जम्मूत आहेत. यावेळी सोनियांना महाराष्ट्रातील आघाडीविषयी विचारणा झाली. त्यावेळी सोनिया उत्तर न देता निघून गेल्या.
 
मात्र काँग्रेसच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे, असं कळताच त्या पुन्हा मागे फिरल्या आणि पत्रकारांपाशी येऊन त्यांनी राष्ट्रवादीवर आघाडी तुटल्याचं खापर फोडलं. मात्र यावेळी त्यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याविषयी बोलणं खुबीनं टाळलं. त्यामुळं काँग्रेसवर आघाडी तोडल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता थेट काँग्रेस पक्षाध्यक्षांनी उत्तर दिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.