राष्ट्रवादी काँग्रेस

उद्धव ठाकरेंचा एमआयएम आणि शरद पवारांवर हल्लाबोल

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. आज औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि एमआयएमच्या ओवेसी बंधूंवर सडकून टीका केलीय. 

Apr 19, 2015, 09:38 PM IST

भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं, अशोक चव्हाणांचा आरोप

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांच्यापाठी राज्यातील मोठे नेते उभे असून काँग्रेसच्या अस्तित्वासाठी ही  निवडणूक महत्वाची असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ते नवी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं असल्याचा आरोप केलाय. 

Apr 18, 2015, 09:55 PM IST

हैदराबादहून येऊन कुणी ऐरा-गैरा राज्य करू शकत नाही- मुख्यमंत्री

औरंगाबादमध्ये भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात सहभाग घेतली. मुख्यमंत्र्यांचीही आज प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमआयएम पक्षावर टीका केली. तसंच सत्ता काबीज करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. 

Apr 18, 2015, 09:03 PM IST

औरंगाबाद महापालिका निवडणूक: युती झाली पण आघाडीत बिघाडी

औरंगाबादमध्ये आघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादीचा गोंधळ सुरुच आहे. त्यात राष्ट्रवादीनं आज उमेदवारांची यादी जाहीर करणार असं सांगितलं आहे. काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र अजून सकारात्मक उत्तर आलं नाही. 

Apr 6, 2015, 10:07 AM IST

पवारांना होमटाऊनमध्येच धक्का, साखर कारखान्यातील सत्ता खालसा

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर साखर कारखान्यात सत्तापरिवर्तन झालंय.

Apr 5, 2015, 09:28 AM IST

नाशकात स्थायी समिती सभापतीपदासाठी मनसेची राष्ट्रवादीला साथ

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं मफलर मनसेच्या गळ्यात पडलंय...... ज्या मफलरवरुन टीकेचा घणाघात करुन मनसेनं नाशिकची सत्ता मिळवली.... आज त्याच राष्ट्रवादीला साथ देत तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या कमरेला मनसेनंच बांधल्या.... महापौरपदाच्या निवडणुकीची मनसेनं परतफेड केली. 

Mar 24, 2015, 08:01 PM IST

राणेंची वांद्रे पूर्वमधून उमेदवारी निश्चित, अधिकृत घोषणा लवकरच

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायणे राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही वेळातच काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राणे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय.

Mar 22, 2015, 08:33 PM IST

वस्त्रहरण झाले, पण द्रौपदी कोण? सामनातून भाजपवर सेनेचा हल्लाबोल

विधान परिषद सभापतींवरील अविश्वास ठरावावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं शिवसेनेला चांगलंच झोंबलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचं चुंबन घेताना दिसत आहेत, असल्या भाषेत सामनाच्या अग्रलेखामध्ये यावर झोड उठवण्यात आलीये. 

Mar 18, 2015, 10:11 AM IST