मुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी

आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत. 

Updated: Oct 12, 2014, 07:40 PM IST
मुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी title=

ठाणे: आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत. 

पाहा मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे - 

 

  • नरेंद्र मोदी ठाण्यातून लाईव्ह
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू...
  • तब्बल २५ वर्षांनंतर कोणी पंतप्रधान ठाण्यात आल्याचं मला नुकतंच सांगण्यात आलंय 
  • कमळाला मतदान करण्याची ठाणेकरांना संधी
  • शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नरेंद्र मोदी
  • काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका
  • काँग्रेस-राष्ट्रवादीचे पापं सहन करू नका, जर तुम्ही त्यांना शिक्षा दिली नाही,
  • तर त्यांना आणखी वाईट करण्याची संधी मिळेल... 
  • काँग्रेसनं मुख्यमंत्री शिफ्टची सिस्टम सुरू केलीय
  • राजकारणाच्या शुद्धीकरणाची गरज
  • मुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी
  • मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि राज्याचे गृहमंत्री म्हणाले,
  • अशा छोट्या घटना घडतच असतात...
  • सध्या आपल्या देशात ६५ टक्के युवक आहेत...
  • संपूर्ण जगात आता कोणता देश मोठा होऊ शकतो तर तो भारत
  • आपल्या सर्व समस्यांचं निराकरण करायला एकच उपाय आहे, तो म्हणजे 'विकास'
  • आपल्या देशात खूप टॅलेंट आहे, सबका साथ, सबका विकास... देशाच्या प्रगतीसाठी
  • महाराष्ट्रातील जनतेला साथ देण्याची संधी...
  • बहूमताचं सरकार आणा... 
  • दिल्लीत मी बसून आहे... महाराष्ट्रातही बहूमताचं सरकार द्या...
  • इतक्या वर्षांपासून बंद असलेल्या योजना सुरू करील
  • १०० वर्ष जुनी रेल्वे व्यवस्था आपल्या देशात आहे
  • जपान, जर्मनी, चीन यांची रेल्वे व्यवस्था अत्याधुनिक आहे
  • आपल्या देशातही तशीच व्यवस्था करणार, सर्वांचे प्रश्न प्रवासाचे सुटले पाहिजे
  • आजची प्रचाराची अखेरची संध्याकाळ आहे, उद्या ५ वाजता प्रचार संपेल
  • सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा... आपलं मत वाया जावू देऊ नका – मोदी

मोदींच्या लोहा इथल्या सभेतील मुद्दे- 

  • सर्व पॉलिटिकल पंडितांचं निष्कर्ष तुम्ही खोटा ठरवा... 
  • लोहा इथल्या लोकांचं लोहा पाहा... मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो
  • माझा जितका राजकारणातला कार्यकाळ आहे, त्याच्या अनुभवानुसार हे मी सांगू शकतो, 
  • महाराष्ट्रात यंदा भाजप संपूर्ण बहूमतानं सरकार बनवणार
  • सर्व मुख्यमंत्र्यांनी आपली घरं भरली, मोदींची टीका

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.