राष्ट्रवादी काँग्रेस

आघाडी कायम, सोनिया-पवारांचा निर्णय

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडलीय त्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पवार आणि सोनियांमध्ये जागावाटपावरही चर्चा झालीय. 

Aug 6, 2014, 05:52 PM IST

10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

Aug 3, 2014, 04:13 PM IST

काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही - डी. पी. त्रिपाठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केलीय. काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही. 

Aug 1, 2014, 07:55 PM IST

महाराष्ट्र सदनात मला सुद्धा जेवणाचा वाईट अनुभव - दलवाई

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकार निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. तर महाराष्ट्र सदनात खरोखरंच गैरसोयी असून त्यावर तातडीनं उपाय योजायला हवेत अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केलीय. 

Jul 23, 2014, 05:03 PM IST

विधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!

जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय. 

Jul 22, 2014, 05:11 PM IST

मी काहीही बोललो तरी गाजावाजा का?- अजितदादांचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात सापडतात. मात्र यावेळी त्यांनी मीडियावर शरसंधान साधलंय. “मी काहीही बोललो तरी इतका गाजावाजा होतो, पण बाकी लोक इतकं बोलतात त्यांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Jul 20, 2014, 09:39 PM IST

भुजबळांचे निकटवर्तीय किशोर कन्हेरे शिवसेनेत

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत असताना त्यांच्या समता परिषदेच्या नेत्यांनी मात्र शिवसेनेची वाट धरलीय. भुजबळांचे निकटवर्तीय आणि विदर्भातले समता परिषदेचे नेते किशोर कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. 

Jul 14, 2014, 01:11 PM IST

चार दिवसात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार- घोरपडे

पुढील चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार असून, पडलेलं भगदाड कशानं बुजवायचं असा प्रश्न पक्षाला पडेल? माजी मंत्री अजितराव घोरपडेंनी असा दावा केलाय. 

Jul 14, 2014, 10:54 AM IST