राष्ट्रवादी काँग्रेस

अरे बापरे! अजित पवारांचा भाजपला इशारा

भाजपानं इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचं केलं नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Nov 26, 2014, 06:07 PM IST

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!

शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय. 

Nov 20, 2014, 11:43 AM IST

भाजपाला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची चूक - जयंत पाटील

मध्यावधी निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चिंतन शिबिरात बोलू लागले आहेत. भाजपला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय. 

Nov 19, 2014, 10:47 AM IST

बहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ

भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.

Nov 12, 2014, 03:48 PM IST

'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी

विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय. 

Nov 11, 2014, 03:45 PM IST