राज्य सरकार

कॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, सरकारचा आदेश

सध्या तरुणांमध्ये फ्रेंडशिप डेचा उत्साह आहे. पण हा अतिउत्साह ठरु नये, यासाठी सरकारनं कंबर कसलीय. फ्रेंडशिप डे असो किंवा व्हॅलंटाईन डे, या निमित्तानं होणा-या दारु पार्ट्या रोखा, असे आदेशच विद्यापीठांना देण्यात आलेत.

Aug 3, 2013, 02:50 PM IST

राज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.

Jun 29, 2013, 08:23 AM IST

१० हजार जण सुरक्षित स्थळी - पंतप्रधान

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jun 19, 2013, 07:07 PM IST

उत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?

राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jun 19, 2013, 02:37 PM IST

मंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’

राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.

Jun 13, 2013, 08:34 AM IST

मंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?

मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.

May 31, 2013, 09:15 PM IST

खुशखबर... महागाई भत्ता अन् पीएफ व्याजदर वाढला!

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

May 16, 2013, 11:54 AM IST

व्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक

दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एस्मा लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात.

May 14, 2013, 12:47 PM IST

कॅग अहवालात राज्य सरकारवर ताशेरे

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या अर्थ आणि जलसंपदा खात्याची पोलखोल करण्यात आली आहे.

Apr 18, 2013, 10:07 PM IST

जातीचा दाखला हवाय, गावाकडं जा!

जातीच्या दाखल्यांसाठी अनेक मुंबईकरांना आता आपल्या मूळ गावी जावं लागणार आहे. वस्तुस्थिती विचारात न घेता राज्य सरकारनं आणलेल्या नव्या जीआरमुळे ही आफत ओढवलीय.

Apr 4, 2013, 10:11 AM IST

`देव माझा यार... सरकार-मीडिया भुंकणारे कुत्रे`

स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी मीडिया-सरकारचा उल्लेख ‘भुंकणारे कुत्रे’ असा केलाय. एव्हढंच नाही तर, देव आपला ‘यार’ आहे असं सांगणाऱ्या बापूंनी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी आपण पाऊस पाडून चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावाही केलाय.

Mar 28, 2013, 02:03 PM IST

अजित पवार, राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते न्यायालयात काम म्हणणे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

Mar 21, 2013, 06:14 PM IST

कर्जमाफीचा घोटाळा

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

Mar 18, 2013, 11:30 PM IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

Mar 18, 2013, 06:13 PM IST

राज्याला रत्नागिरी वीज प्रकल्प डोईजड

पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Mar 12, 2013, 03:03 PM IST