राज्य सरकार

राज्य सरकारमध्ये मुंबईला मिळणार झुकते माप

राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे बहुमतात सरकार आले नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करीत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेवर दबावतंत्र अवलंबिल्याचे धोरण सुरु आहे. जर सेनेचा पाठिंबा मिळाला नाहीतर अल्पमतात सरकार बनवायचे आणि मुंबईला जास्तीत जास्त मंत्रिपदे देण्याची व्युहरचना करण्यात येत आहे.

Oct 22, 2014, 10:14 AM IST

मुंबईतील बत्ती गुल, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश

 मुंबईतल्या कालच्या विजेच्या लपंडावाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली असून सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sep 3, 2014, 03:39 PM IST

जनतेचा पैसा जाहिरातीवर, राज्य सरकारला खेचलं कोर्टात

 राज्यसरकारच्या जाहिरातींविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी याचिका दाखल केलीय. 

Aug 20, 2014, 06:22 PM IST

राज्य सरकारकडून धनगरांना 'ठेंगा' ?

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आघाडी सरकारनं अखेर वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. 

Aug 13, 2014, 11:21 PM IST

बिग बी झाले महाराष्ट्राचे 'बागवान'!

बिग बी अमिताभ बच्चन आता आपल्याला मराठी वेशात चक्क फळांचं प्रमोशन करतांना दिसणार आहेत. राज्यातील फळबागांना चालना देण्यासाठी अमिताभ बच्चनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली.

Jul 27, 2014, 02:32 PM IST

तुम्हाला आता 'एनए' करण्याची गरजच नाही!

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शेतजमिनीचा विकास करण्यासाठी आता एनए करण्याची गरज नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

Jul 16, 2014, 02:57 PM IST

डॉक्टर संपाचे 80 बळी?, मृत्यूबाबत अहवाल द्या - हायकोर्ट

नुकत्याच झालेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिका-यांच्या संपात किती रूग्णांचे मृत्यू झाले, कितीजण उपचारांपासून वंचित राहीले याचा अहवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागवला आहे. दोन आठवड्यात हा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Jul 10, 2014, 09:36 AM IST

राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद

 मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. 

Jul 1, 2014, 08:12 AM IST

पाणीप्रश्नावर सरकार गंभीर, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिका-यांना आदेश

 राज्यात गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नाची राज्य सरकारनं अखेर दखल घेतलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणीप्रश्नाबाबत लक्ष घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

Jun 27, 2014, 07:37 PM IST

राज्य सरकारचा जीआर की फतवा, विद्यार्थ्यावर अन्याय

पदवी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया संपत आली आणि आता कुठं महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. अल्पसंख्याक कॉलेजांमधील अल्पसंख्याकांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवीन जीआर काढलाय. त्यामुळं प्रवेशाचा घोळ आणखी वाढणार असून, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर विशेषतः मराठी मुलांवर अन्याय होणार आहे.

Jun 23, 2014, 10:30 PM IST

खुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?

राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

Jun 7, 2014, 11:50 AM IST

अमित देशमुखांची लागणार मंत्रीपदी वर्णी?

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.

May 28, 2014, 07:28 PM IST