राज्य सरकार

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत जाहीर

राज्यात गारपीटीनं नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकारनं अखेर मदत झाहीर केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या मदतीची घोषणा विधानसभेत केली असून यामध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. 

Dec 16, 2014, 06:11 PM IST

सेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच

सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.

Nov 29, 2014, 11:19 AM IST

राज्याच्या गृहनिर्माण धोरणात होणार बदल

मुंबईत परवडणा-या दरातील घरांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारनं सध्याच्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचं ठरवलंय

Nov 22, 2014, 01:02 PM IST

भाजप सरकारचे एलबीटी रद्द करण्यावर घुमजाव

 विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यावर व्यापाऱ्यांसाठी जाचक असा एलबीटी करार रद्द केला जाईल, असे जाहीर आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, याच भाजपने सत्तेवर आल्यानंतर याबाबत घुमजाव केले आहे.

Nov 20, 2014, 04:44 PM IST

राज्य सरकार स्थिर : मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, एकाही आमदाराला वाटत नाही की, पुन्हा निवडणूक लढवावी, त्यामुळे सरकार स्थिर असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Nov 18, 2014, 05:07 PM IST

तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील सत्य

जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालातली माहिती 'झी २४ तास'कडे आलीय. त्यानुसार संजय आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून करण्यात आलीय. तर सुनील जाधव याचा गळा चिरून खून करण्यात आला.

Nov 4, 2014, 03:47 PM IST

मावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले

मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

Nov 1, 2014, 10:05 PM IST

दलित हत्याकांडाची राज्य सरकारकडून गंभीर दखल

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. या दलित हत्याकांडाची डीआयजी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 1, 2014, 09:43 PM IST