राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद

 मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. 

Updated: Jul 1, 2014, 12:15 PM IST
राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. 

शासनस्तरावर निर्णय झाला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा डॉक्टरांच्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेनं (मंग्मो) दिलाय. गेली चार वर्षे डॉक्टरांची 'मग्मो' संघटना मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे. शासनाच्या सेवेत समावेश न करण्यात आलेल्या सन २००९ आणी २०१० सालच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाभ द्यावेत, डॉक्टरांचे कामाचे तास निश्चित करून निवृत्ती वय ५८ वरून ६२ करावे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्ती मार्गी लावणे, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना रखडलेल्या वेतनवाढीचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी २ जून रोजी मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता.

याबाबत १० दिवसांत अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र याची अंबलबजावणी झालीच नाही, असा आरोप मग्मोचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केलाय. आझाद मैदानात धरणे आंदोलन तसेच राज्यभरातील जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय ठाण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.