मुंबईतील बत्ती गुल, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश

 मुंबईतल्या कालच्या विजेच्या लपंडावाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली असून सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

Updated: Sep 3, 2014, 03:39 PM IST
मुंबईतील बत्ती गुल, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश title=

मुंबई : मुंबईतल्या कालच्या विजेच्या लपंडावाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली असून सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

उमपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिले असून ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव या प्रकरणाची चौकशी करतील. सात दिवसात अहवाद सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

 ट्रॉम्बेमधला टाटा वीजनिर्मितीचा प्रकल्प तांत्रिक बिघाडामुळं बंद पडल्यानं अर्धी मुंबई काही तास अंधारात होती. ऐन गणेशोत्सवात वीज गूल झाल्यामुळं नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा जवळपास 40 टक्के भाग काल अंधारात बुडालाय. टाटाच्या ट्रॉम्बे इथल्या 500 मेगावॅटच्या युनिट नंबर पाचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील बहुतांश भागात वीज गायब झालीय. सकाळी पावणे दहा वाजल्यापासून हा वीजपुरवठा खंडीत झाला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.