राष्ट्रवादीला शून्य करण्याचा राहुल गांधींचा फॉर्म्युला
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीला महाराष्ट्रात शून्य करण्यासाठी कंबर कसली असून आज पुण्यात त्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला नामशेष करण्याचा फॉर्म्युला दिला.
Sep 25, 2013, 05:47 PM ISTपुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कांद्याची ‘मेजवानी’!
पुण्यात सुरू असलेल्या राहुल गांधींच्या बैठकीत कांद्याचा सुकाळ पहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना कांद्याची मेजवानी देण्यात येतेय. एकीकडे ७० ते ८० रुपयांच्या घरात गेलेला कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढतोय. काँग्रेससाठी मात्र कांद्याचा महापूर वाहतोय, असंच पुण्यातल्या या मेजवानीवरून दिसतंय.
Sep 25, 2013, 02:28 PM ISTसजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम
पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.
Sep 25, 2013, 12:57 PM ISTतुरूंगातील कार्यक्रमात संजू बाबा अभिनेता
सध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त एका नाटकात भूमिका करणार आहे. कार्यक्रमाची पटकथा आणि निर्मिती तुरूंगातील कैद्यांचीच आहे.
Sep 24, 2013, 07:16 PM ISTसंतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती...
स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.
Sep 21, 2013, 04:21 PM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.
Sep 20, 2013, 12:04 PM ISTदाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात? - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Sep 19, 2013, 12:32 PM ISTबाप्पाला निरोप : मुंबई-पुण्यातील रस्ते फुलले, लालबाग राजाचे विसर्जन
मुंबई आणि पुण्यात गणरायाच्या विसर्जनाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व उत्साह होता. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्याचे रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय.
Sep 19, 2013, 09:22 AM ISTबाप्पा निघाले गावाला...चैन पडेना आम्हाला!
आपल्या भक्तांच्या घरी ११ दिवस राहिल्यानंतर आज गणपती बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. घरगुती बाप्पांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केलीय.
Sep 18, 2013, 07:48 AM ISTपोलीस आयुक्तांनाच विसर्जित करा - शिवसेना
मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विसर्जित करा, असं सांगणाऱ्या शिवसेनेनं आता कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही लक्ष्य केलंय.
Sep 12, 2013, 11:31 AM ISTपाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!
पुण्यातल्या टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किसन राठोडची कात्रज टेकडीवरची पाच एकर जमीन बुधवारी अवघ्याय एका रुपयामध्ये सरकारजमा करण्यात आलीय.
Sep 10, 2013, 11:01 PM ISTमुख्यमंत्र्यावर शरद पवारांचा वार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केलीय. अलिकडच्या काळात प्रशासनातील लोकांचा हात सही करताना थरथरतो. त्यांना लकवा धरला की काय..? दोन-दोन महिने फायलींवर सह्या होत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून घरचा आहेर दिलाय
Sep 10, 2013, 08:38 PM ISTभोंदूबाबाचा पुण्यातील तरूणीवर बलात्कार
इच्छापूर्तीचा ताविज बनवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा इथं ही घटना घडली आहे
Sep 6, 2013, 11:35 AM ISTसंजय दत्तचं नवं 'नाटक'; बालगंधर्व रंगमंदिरातही हिरोगिरी!
गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणाऱ्या संजय दत्तची हिरोगिरी आता बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावरही दिसणार आहे. येरवडा जेलमधील कैद्यांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
Sep 5, 2013, 03:05 PM ISTराज्याचं डिझाइन बदलायचं असेल तर.... – राज ठाकरे
डिझाइन हे केवळ साड्या, दागिने, कपडे यांच्यासाठीच नसतं तर ते आपल्या सार्वजनिक जगासाठीही असतं. तुम्हांला बाहेरचाही तोच विचार केला पाहिजे. राजकारणातील सर्वांचे बंगले, फार्म हाऊस हे कसे चांगले असतात. त्यांना बाहेरचं विश्व का करावसं वाटत नाही. मी हे बोलू शकतो कारण माझ्या हातात सत्ता नाही, मी द्या असं सांगायला आलो नाही. समाजाचं डिझाइन बदलायचं असेल तर त्या डिझाइनमध्ये तुम्ही आले पाहीजे, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष आणि आज पुरते झालेल्या राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केलं.
Aug 31, 2013, 09:43 PM IST