www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात सुरू असलेल्या राहुल गांधींच्या बैठकीत कांद्याचा सुकाळ पहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना कांद्याची मेजवानी देण्यात येतेय. एकीकडे ७० ते ८० रुपयांच्या घरात गेलेला कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढतोय. काँग्रेससाठी मात्र कांद्याचा महापूर वाहतोय, असंच पुण्यातल्या या मेजवानीवरून दिसतंय.
पुण्यातले काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी मात्र आपल्या बैठकीत कांद्याचा बिलकुल वापर केला नसल्याचा अजब दावा केलाय.
मग कांद्यावर हा ताव मारला जातानची झी मीडियानं दाखवलेली ही दृष्य खोटी आहेत, असं गाडगीळ यांना म्हणायचंय का? की काँग्रेस नेत्यांनी काहीही सांगितलं तरी त्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे, अशी तर गाडगीळ यांची अपेक्षा नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते शिवछत्रपती क्रीडा नगरीत दाखल झाले. राहुल गांधी आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खान्देशातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणारेत.
काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्याबरोबरच युपीए सरकारच्या लोकहिताच्या योजना जनतेपर्यंत आक्रमकपणे पोहचवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील खासदार सुरेश कलमाडी हे पक्षातून निलंबित असल्यानं त्यांना बैठकीत स्थान देण्यात आलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ