पुणे

प्राध्यापक राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आज एका वेगळ्याचा भूमिकेत दिसणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेहमी आपल्या ठाकरी शैलीत मार्गदर्शन करतात, पण आज पुण्यात राज ठाकरे प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Aug 31, 2013, 06:05 PM IST

पुण्यात सायबर रॅकेटचा पर्दाफाश, ५६ लाखांचा गंडा

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका मोठ्या सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठी रक्कम जिंकल्याचा ई मेल पाठवून लोकांना फसवणा-या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड मधल्या एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतलयं. त्यान पिंपरी चिंचवड मधल्या एका नागरिकाला तब्बल ५६ लाखांचा गंडा घातल्याचं उघड झाले आहे.

Aug 31, 2013, 12:11 PM IST

डॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणंचं सीसीटीव्ही फूटेज आता अधिक तपासणीसाठी लंडनला पाठवले जाणार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी साळुंखे यांनी ही माहिती दिलीय.

Aug 30, 2013, 08:40 AM IST

पुण्यात रूबी हॉस्पिटलची तोडफोड, ४ जखमी

पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलवर हल्लाबोल केला. या तोडफोडीमध्ये ४ कर्मचारी जखमी झालेत.

Aug 27, 2013, 05:49 PM IST

पोलीसच ‘सीबीआय’ अधिकारी बनतो तेव्हा...

तोतया पोलिसांकडून फसवणूक झाल्याचा प्रकार अनेकदा आपल्या कानावर पडत असतो. मात्र, खरेखुरे पोलिसच असे प्रकार करतील असेल तर? ही काल्पनिक स्थिती नाही तर सत्य घटना आहे.

Aug 27, 2013, 11:52 AM IST

मुंडेंची पंकजा पोलिसांच्या ताब्यात!

मुंबईतला सामूहिक बलात्कार आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी भाजपनं पुण्यात जोरदार आंदोलन केलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यात आली. आंदोलनानंतर आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Aug 25, 2013, 04:10 PM IST

गुन्हेगारीत मुंबई, पुणे आघाडीवर

गेल्या काही दिवसात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. एका मागून एक घडणा-या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट हादरून गेलाय. गुन्हेगारीच्या बाबती महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याचं राज्याच्या गुन्हे २०१२च्या अहवालावरून दिसून येतं आहे.

Aug 23, 2013, 12:07 PM IST

दाभोलकरांच्या हत्याप्रकरणी धागेदोरे, पोलिसांचा दावा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी मारून हत्या करणाऱ्यांच्या मोटरसाईकलचा तपास लागला आहे, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

Aug 23, 2013, 11:04 AM IST

देहू रोड इथे ट्रकने दोघांना उडविले

पिंपरी-चिंचवड जवळील देहू रोड इथ झालेल्या अपघातात PMPML च्या दोन तपासानिकांचा मृत्यू झालाय तर दोनजण गंभीर जखमी झालेत. नंदकुमार किरणकुमार राजपूत, विठ्ठल कृष्णा माळी अस मृत तपासानिकांची नाव आहेत.

Aug 22, 2013, 11:08 AM IST

पुण्यात अभाविप कार्यकर्त्यांचा राडा, विद्यार्थ्यांना मारहाण

पुण्यातल्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कबीर कला मंचच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय.

Aug 22, 2013, 09:07 AM IST

दाभोलकर हत्येनंतर पुण्यात राजकीय पक्षांच्यावतीनं निषेध

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे पडसाद आजही सर्वत्र उमटले. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ दाभोलकरांनी उभारलेली चळवळ पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Aug 21, 2013, 10:59 PM IST

मुंबई क्राईम ब्रॅँचकडे तपास, दाभोलकर कुटुंबीयांची तीव्र प्रतिक्रिया

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुंबई क्राईम ब्रॅँचकडून स्वतंत्रपणे तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रँचची एक टीमही पुण्यात दाखल झालीय. मुंबई क्राईम ब्रँचला दाभोलकरांच्या मारेक-याबद्दल काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत. त्यानुसार हा तपास करण्यात येणार आहे. तर कुटुंबीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Aug 21, 2013, 02:16 PM IST

उष:काल होता होता काळ रात्र...

पुणं हे नेहमीच पुरोगामी चळवळीचं केंद्र राहिलंय. अनिष्ट रुढी आणि परंपरांविरोधात युद्ध पुकारणारे अनेक मोठे सुमाजसुधारक पुण्यानं दिले. या पुण्यभूमीतच समाजसुधारकांना छळालाही सामोरं जावं लागलं. पुरोगामी दाभोलकरांच्या बाबतीत मात्र प्रतिगामी शक्तींनी अमानुषतेचं टोक गाठलं. दाभोलकरांच्या हत्येमुळं उष:काल होता होता काळ रात्र झाल्याचाच अनुभव महाराष्ट्राला आलाय.

Aug 21, 2013, 11:30 AM IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचं वादळ

अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रात समानार्थी शब्द बनलेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी त्यांनी हयातभर `साधना` केली. पुरोगामित्वाचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात त्यांची हत्या व्हावी, यासारखं दुसरं दुर्दैव ते कोणतं..?

Aug 21, 2013, 11:22 AM IST

दाभोलकरांची हत्या सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट - राणे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे. ही संपूर्ण सरकाराची जबाबदारी आहे, असा घरचा आहेर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलाय.

Aug 21, 2013, 10:01 AM IST