www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केलीय.
अलिकडच्या काळात प्रशासनातील लोकांचा हात सही करताना थरथरतो. त्यांना लकवा धरला की काय..? दोन-दोन महिने फायलींवर सह्या होत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून घरचा आहेर दिलाय. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फाईल्सवर सह्या करणं टाळतात. लवकर फाईल्स पुढं सरकत नाही, अशी तक्रार कायम मंत्र्यांकडूनही केली जाते. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचं नातंही आरोप-प्रत्यारोपांमध्ये घेरलेलं दिसतं. त्यावर आता शरद पवारांनी टीका करुन मुख्यमंत्र्यांना जोरदार हादरा दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.