पोलीस आयुक्तांनाच विसर्जित करा - शिवसेना

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विसर्जित करा, असं सांगणाऱ्या शिवसेनेनं आता कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही लक्ष्य केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 12, 2013, 11:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विसर्जित करा, असं सांगणाऱ्या शिवसेनेनं आता कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही लक्ष्य केलंय.
दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास आणि शहरातील गुन्हेगारी कमी करण्यास पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. शिवसेचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना निवेदन दिलंय.

कीर्तीकर यांनी शहरातील भाजप तसेच शिवसेनेच्या आमदारांसह पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन निवेदन दिलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईबाबत भेदभाव करत असल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.