हाय प्रोफाईल मुन्नाभाई, चक्क पवारांपासून पतंगरावपर्यंतचे मोबाईल नंबर
अमित जगन्नाथ कांबळे उर्फ मुन्नाभाई एम बी बी एस. पुण्यातला या चोवीस वर्षीय बोगस डॉक्टरनं अनेकांना फसवलंय. यासाठी तो पुण्यातील विवीध रूग्णालयात फोन करून नवीन दाखल झालेल्या रूग्णाची माहिती घ्यायचा. त्यानंतर स्वतः किडनितज्ज्ञ असल्याचं रूग्णाच्या नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
Nov 13, 2013, 08:04 AM IST३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.
Nov 12, 2013, 02:58 PM ISTतिच्या अचानक जाण्यानं कोल्हापूरकर हळहळले...
पुण्याहून परतताना कोल्हापूरच्या श्रुतिका चंदवाणी बरोबर अन्य तिघांचा अपघातात मृत्यू झाला. यातील श्रुतिका ही अव्वल दर्जाची स्केटिंगपट्टू होती. एवढंच नव्हे तर वयाच्या सहाव्या वर्षी श्रुतिका चंदवाणीनं ‘लिंबो स्केटिंग’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता. तिच्या जाण्यानं स्केटिंग मधला एक तारा निखळा असल्याचं तिच्या प्रशिक्षकांबरोबर अन्य कोल्हापूरकरांना वाटतंय.
Nov 10, 2013, 07:38 PM ISTचक्क एसटी चालकाला लष्करी जवानांनी उचलून नेले, प्रवाशी वाऱ्यावर
बस चालकानं अपघात टाळत समोरच्या कारला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गाडी थांबवली. त्याच वेळी मागून येणा-या एका लष्कराचा ट्रक बसला येऊन धडकला. या ट्रकमधील जवानांना राग आला आणि त्यांनी चक्क बस ड्रायव्हरला उचलून ट्रकमध्ये टाकलं आणि घेवून गेले.
Nov 9, 2013, 07:36 PM ISTपुणे पोलीस उपायुक्तांची अरेरावीनंतर महिलांना मारहाण
पुण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडलाय.
Nov 8, 2013, 10:18 PM ISTश्रुतिका स्केटिंग मास्टर, लिम्काबुकमध्ये विक्रमाची नोंद
श्रुतिका चंदवानी ही मूळची कोल्हापूरची. श्रुतिका (२२) ही स्केटिंगमध्ये मास्टर होती. तिच्या विक्रमाची नोंद लिम्काबुकमध्ये करण्यात आली आहे.
Nov 8, 2013, 04:41 PM ISTसाईंच्या पालखीत पोलिसाची अरेरावी; महिलांनाही शिवीगाळ
ण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला.
Nov 8, 2013, 10:12 AM ISTपुण्यातील मॉडर्न कॅफेला आग
पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या मॉडर्न कॅफेला सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमधल्या भटार खाण्यात आग लागली होती. आगीत हॉटेलचं नुकसान झालंय मात्र, कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Nov 7, 2013, 04:26 PM IST‘त्या’ चार मित्रांना मिळाली जलसमाधी
पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालंय. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत.
Nov 7, 2013, 01:49 PM IST‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?
पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागलाय. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली ही गाडी सापडलीय.
Nov 7, 2013, 01:10 PM ISTश्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...
पुण्यातून पाच दिवसांपूर्वी गायब झालेल्या चौघांपैकी एक तरुण, चिंतन बूच याचा मृतदेह सापडलाय. नीरा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अन्य दोन तरुण आणि एका तरुणीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही.
Nov 6, 2013, 10:34 PM IST‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला
पुण्यातल्या गायब झालेल्या तरुणांपैकी चिंतन बुच या तरुणाचा निरा नदीत मृतदेह सापडलाय. चार दिवसांपूर्वी पुण्याहून निघालेले चार तरुण अचानक बेपत्ता झाले होते. त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. इतर तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.
Nov 6, 2013, 12:59 PM ISTपुण्यात एकाच कंपनीतील चौघं अचानक बेपत्ता
पुण्यामध्ये एकाच कंपनीतील चार कर्मचारी एकाचवेळी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. चांदणी चौकातील एका अॅड एजंसीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला असलेले चौघेही गेल्या १ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. हे सर्वजण २८ ते ३० वयोगटातील असून, त्यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे.
Nov 4, 2013, 02:20 PM ISTकाँग्रेसचं आता कठिण आहे बाबा - मोदी
आज नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुण्याला दाखल झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांनी काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Nov 1, 2013, 06:29 PM ISTपुण्यात मोदी नमो नम:, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौ-याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पाटण्यातल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
Nov 1, 2013, 11:23 AM IST