पुणे : अखेर पुण्यात पाणीकपात लागू झालीय. शनिवारपासून पुणेकरांना दिवसात एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला.
शनिवार पासून पुणेकरांना दिवसात एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांनी दिलीय.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त १.९६ टीएमसी एवढा पाणी साठा शिल्लक राहिला आहे. बाष्पीभावानंतर १.८० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. यातून १५ जुलैपर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन महापालिका आणि जलसंपदा विभागाचं होतं.
मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजून पाऊस झालेला झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैच्या पुढेही टिकवणे गरचेचे बनले होते. त्यामुळे अखेर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय. कपातीनंतर उपलब्ध पाणीसाठा १५ ऑगस्ट पर्यंत पुरू शकणार आहे. त्यापूर्वी समाधानकारक पावूस होऊन धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यास ही पाणीकपात रद्द होऊ शकते.
पुण्यातील धरणांच्या स्थितीवर एक नजर...
धरण | पाणीसाठा |
खडकवासला | 00.81 टीएमसी |
पानशेत | 01.15 टीएमसी |
वरसगाव | 00.00 टीएमसी |
टेमघर | 00.00 टीएमसी |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.