भटके मतदार कसे - राज ठाकरे

मुंबईतील भटके मतदार कसे होऊ शकतात. त्यांची नावे मतदार यादीत नकोत, असे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगताच आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.

Updated: Dec 2, 2011, 08:11 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईतील भटके मतदार कसे होऊ शकतात. त्यांची नावे मतदार यादीत नकोत, असे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगताच आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.

रस्त्यावर राहणाऱ्यांना निवडणुकीसाठी मतदान करू देऊ नका, अशी मागणी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली. राज ठाकरे यांनी मंत्रालयात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी फुटपाथ आणि रस्त्यावर राहणाऱ्यांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखण्याची गरज असल्याचे सांगितले.

हे सर्व बोगस मतदान टाऴण्याठी गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईतील भटक्या मतदारांमुळे बोगस मतदानात वाढ होत आहे. कोणतीही शहानिशा करता त्यांची नावे मतदार यादीत घातली जातात, हे अयोग्य आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले. यावेळी राज यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना दिले.