Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 18, 2025, 12:17 PM IST
Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी? title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19  फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जवळपास सर्वच देशांनी त्यांच्या संघांची घोषणा केली असून भारतीय क्रिकेटर नियामक मंडळ (BCCI) सुद्धा शनिवार 18 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. मुंबईत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अजित आगरकर हे पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करतील. टीम इंडियाची घोषणा झाल्यावर दुपारी 12:30 ते  1:00 च्या सुमारास पत्रकार परिषद पार पडेल. चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार चॅम्पियन्स ट्रॉफी : 

2017 नंतर आयसीसी यंदा प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत असून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवली जाईल. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद असून दुबईत भारताचे सर्व सामने खेळवले जातील. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार असून 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. तर भारताचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळवला जाईल. भारताचा शेवटचा लीग सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल. 

हेही वाचा : 'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला

 

दोन ग्रुपमध्ये विभागले गेले 8 संघ : 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून ग्रुप ए मध्ये भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये अफगानिस्तान, इंग्लंड , दक्षिण अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 15 सामने खेळवले जातील. 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, सूर्य कुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, ऋषभ पंत 

राखीव: मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन