राज ठाकरेंकडून महापौर यतीन वाघ यांची खरडपट्टी

नाशिक महापालिकेत सत्तेची दोन वर्ष पूर्ण केलेल्या महापौर आणि मनसे नगरसेवकांच्या कामांचं ऑ़डिट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केलं. कृष्णकुंजवर घेतलेल्या बैठकीत महापौर यतीन वाघ यांची राज ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.

Updated: Jan 22, 2014, 04:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नाशिक महापालिकेत सत्तेची दोन वर्ष पूर्ण केलेल्या महापौर आणि मनसे नगरसेवकांच्या कामांचं ऑ़डिट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केलं. कृष्णकुंजवर घेतलेल्या बैठकीत महापौर यतीन वाघ यांची राज ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.
विधायक कामांवर भर देण्याचा सूचना देऊन नगरसेवकांचीही झाडाझडती घेतली. मात्र राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांवर समाधान व्यक्त केल्याचा दावा मनसे गटनेते अशोक सातभाई यांनी केला.
कामे होत आहेत, मात्र ती जनतेपर्यंत पोहचत नसल्यामुळं राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. जनतेतून मनसेच्या कामांवर टीका होऊ लागल्यानं, तसंच निवडणूक सर्व्हेक्षण चाचणीतून मनसेची राज्यात पीछेहाट झाल्यामुळं राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली होती.
नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या दौ-यातही नाशिकच्या नगरसेवकांची राज ठाकरेंनी झाडाझडती घेतली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.