www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
तरुणाईची नस पकडत नाशिकमध्ये मनसे कामाला लागलीय. मनसेची नवी घोषणा आहे `वाय-फाय नाशिक`.... कॉलेजरोडवरच्या कट्ट्यांवर या वाय-फाय नाशिकबद्दल चांगल्या प्रतिक्रिया असल्या तरी आधी मुलभूत सुविधा द्या, मग नाशिक वायफाय करा, असा खोचक सल्ला विरोधकांनी दिलाय.
नाशिकमधल्या कॉलेज रोडवरच्या तरुणाईला आता फेसबुक आणि व्हॉटसअपवरचं चॅटिंग आणखी सोपं आणि उत्साहात करता येणार आहे. कारण, वाय-फाय नाशिक करण्याचा विडा आता महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी उचललाय. सुरुवातीला कॉलेज रोड गंगापूर रोड, कँनडा कॉर्नर वाय-फाय केलं जाणार आहे.
या नव्या वायफाय घोषणेच्या नावाखाली तरुणांना आकर्षित करण्याचं राजकारण मसने खेळत असल्याचा आरोप होतोय. आधी नाशिकमधले शिक्षण, आरोग्य, पाणी आणि घंटागाडीचे प्रश्न सोडवा, मग नाशिक वायफाय करा, असा खोचक सल्ला विरोधक देतायत.
सत्ता हवी असेल तर तरुणांची मनं जिंकायला हवीत, तरच त्यांची मतं पडतील, हे मनसेला उमगलंय. त्या दृष्टीनंच हे हायफाय आणि वाय-फाय निर्णय घेतले जातायत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.