www.24taas.com, झी मीडिया, नागपूर/परभणी/धुळे
महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.
औरंगाबादमध्येही सतत ६व्या दिवशीही गारांच्या पावसांनी धुमाकूळ घातला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गारांचा सडा सुरुच आहे.. सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा जोराचा पाऊस आला. गारांचा हा पाऊस सकाळी ९ वाजेपर्यंत सुरुच होता. त्यामुळे या भागानं जणू पांढरीशुभ्र चादर ओढल्याचेच चित्र होतं. नाशिक विभागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील पिकांना तडाखा बसलाय..जळगावमध्येही वसानं एकचा बळी घेतलाय. विदर्भाच्या नागपूर, वर्धा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यात वादळाने अक्षरशः धुमाकूळ माजवलाय.
राज्यात २८ जिल्ह्यात गारपीटीमुळे मोठं नुकसानं झालंय. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यसरकारला शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याची मागणी केलीये. संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्षे इत्यादी फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तर गहु, हरभरा, मका, भाजीपाला या पिकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी मदतीची मागणी केलीये.
तर गारपीटीमुळे मृत्यू झालेल्या किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत मिळावी यासाठी तर ज्य़ांनी पशुधन गमावलं आहे त्यांना २५ हजाराची मदत करावी अशी ही मागणी आहे. गारपीटीवर मदत करण्यासाठी तातडीनं कॅबिनेटची बैठक घेण्यात यावी यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.
अवकाळी पाऊस उसाला जरी पोषक असला तरी इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळे ऊस तोडणी रखडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मका, हरबरा, गहु यासारख्या पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्हयातील बळीराजा चिंतेत आहे.
अवेळी आलेल्या या वादळाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एवढं नुकसान झालं असतांनाही सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्याच कॅबिनेटची बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गोपनीथ मुंडे यांनी केलीय.
तर गारपीटीचा पंचनामा करुन राज्य सरकारनं लवकरात लवकर अहवाल द्यावा, निवडणूक आयोगाची परवानगी देऊन ३ ते ८ दिवसांत मदत करु असं आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलंय, ते सोलापुरात बोलत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.