कोयना, वारणा परिसरातील गावांना धोका

राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 26, 2013, 09:05 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.
मुसळधार पावसामुळे औंदबराचे दत्त मंदिरही पाण्यात गेलंय. तर भिलवडी इथे निखिल पटेल हा दहावीत शिकणारा विध्यार्थी कृष्णा नदीत वाहून गेलाय. कोल्हापूर जिल्हयातील पुरपरिस्थीती जैसे थे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संततधार कायम आहे.

वर्धा नदीला आलेल्या पुराने चंद्रपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक खोळंबलीय. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील अनेक गावामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात वाण धरणाचे ६ पैकी ४ दरवाजे उघडण्यात आले असून तेल्हारा तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अरुणावती धरणाचे १२ पैकी ५ दरवाजे उघडण्यात आलेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. मात्र चिपळूण खेड,संगमेश्वर इथली पूरस्थिती कायम आहे. किना-यावर आजही मोठ्या लाटा धडकत असल्यानं समुद्र किनारी राहणार्याू लोकांमधे भीतीचं वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.