www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड
चंद्रपूर जिल्ह्यात पूर स्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.
शहरातून आतापर्यंत 2 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर ग्रामीण भागातल्या 560 जणांना बाहेर काढण्यात आलंय. इरई धरण ३० टक्के रिकामं करण्यात आलय. पूरस्थितीतून नागरिकांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
यवतमाळला पावसाचा जोरदार तडाखा
यवतमाळला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून या पावसात यवतमाळ जिल्ह्यातले पाच जण वाहून गेलेत. पुसदमध्ये 3 वर्षांती मुलगी आणि आई वाहून गेले. तर महागावमध्ये 42 वर्षांचा व्यक्ती वाहून गेलाय.
राळेगाव तालुक्यातही एक जण वाहून गेलाय. जिल्ह्यात पावसानं आत्ताचं वार्षिक सरासरी ओलांडलीय... वणी, उमरखेड, महागाव, पुसद, आर्णी, झरी जामणी या तालुक्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालीयं... पैनगंगा, खुनी, वाघाडी, पूस, अरुणावती, अडान, निर्गुडा या नद्यांना महापूर आला असून अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे...
सततच्या पावसामुळे सर्व लघु मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून इसापूर, बेंबळा, अडान, अरुणावती, पूस या पाच प्रकल्पांचे ४१ दरवाजे उघडले आहेत. अतिवृष्टीने सर्वाधिक हानी झाली ती शेती व शेतकऱ्यांची. जवळपास एक लाख हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झालय.
रायगडमध्ये पुराचा धोका
रायगडमध्ये पुराचा धोका कायम आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार सुरुच आहे. गांधारी ब्रीजवरून पाणी ओसरलंय मात्र पुराचा धोका कायम आहे. गांधारी ब्रीजवरून ओसरल्यानंतरही धोका कायम आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.