उद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात

रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2013, 12:34 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, सिंधुदुर्ग
रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायगणी - तोंडवली गावच्या माळरानावर हा प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात २५० एकर जागा मागण्यात आली होती. नंतर मात्र १३९० एकर जागेचा घाट घातला जातोय. मात्र अतिरिक्त जमीन संपादनाला शेतक-यांनी विरोध केलाय. जगातला एकही प्रकल्प २५० हून अधिक एकरमध्ये नाही मग सिंधुदुर्गलाच हा निकष का? असा मुद्दा मांडत विरोधकही मैदानात उतरलेत.
राणेंनी थेट प्रकल्पाला विरोध करणा-यांना तडीपार करु, अशी भाषा वापरल्यानं वाद अधिकच तापला आहे. तर शेतक-यांना या प्रकल्पाबद्दल काहीच माहिती दिली गेली नसल्यानं त्यांचा विरोध कायम आहे. यातूनच जिल्हयात नवा संघर्ष उभा ठाकलाय.
या प्रकरणातून राणे विरुध इतर सर्व असं चित्र पाहायला मिळू लागलं आहे. निर्माण झालेली संघर्षाची धार कोकणाला पुन्हा जैतापूरच्या वाटेनेच नेणार अशीच चिन्ह दिसत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ