कोकणात दुबार पेरणीचे संकट

 पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.

Updated: Jun 26, 2014, 11:47 PM IST
कोकणात दुबार पेरणीचे संकट title=

रत्नागिरी, सिंधुदुर्ग : पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.

पावसाळ्यात कोकणात धोधो पाऊस कोसळतो. दिवसाला 400 मीमी पाऊस कोकणात होतो. मात्र जून महिना संपायला आला तरी कोकणात एकूण 400 मीमी पाऊस झालेला नाही. कमी झालेल्या पावसाचा तडाखा बळीराजाला बसलाय. त्याचबरोबर धरण क्षेत्रातही खडखडाट आहे. केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या पाणीसंकट घोंघावतंय.

कोकणात सुरूवातीला झालेल्या पावसावर भिस्त ठेऊन शेतक-यांनी पेरणी केली खरी. पण आता पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं संकट आलंय. सिंधुदुर्गात शेतकरी हातपंपाच्या सहाय्याने शेती जगवायच्या प्रयत्नात आहेत. दुबार पेरणीची शक्यता पाहता आता रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी दुबार पेरणीसाठी बियाणे जिल्हा नियोजनमंडळाला पुरवठ्याच्या सुचना केल्या आहेत.

अजून केवळ 2 महिने पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या कोकणात शिल्लक आहे. त्यामुळे कोकणात येत्या दोन तीन दिवसांत पाऊस आला नाही तर भीषण पाणीटंचाईचं संकट आहे. त्यामुळे सध्या जे पाणी आहे ते काटेकोरपणे वापरण्याची गरज आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.