मुंबई, कोकणासह मराठवाडयात पाऊस

आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडयात वरूण राजा बरसला.

Updated: Jul 9, 2014, 08:13 AM IST
मुंबई, कोकणासह मराठवाडयात पाऊस title=

मुंबई : आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडयात वरूण राजा बरसला.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. पंढरपूर, मुंबई, ठाणे, कोकणात पावसानं दमदार हजेरी लावलीय. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही वरुणराजा बरसलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजासह सामान्य सुखावलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.