मुंबई : मी जो काही निर्णय घेतला आहे. त्याच्यावर ठाम आहे, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. राणे सोमवारी राजीनामा देणार हे आता स्पष्टच झाले आहे.
काल रात्री काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भेट घेतली. नाराज राणे यांची समजूत काढण्याचा ठाकरे यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांचाही फोन राणे यांना याला. त्यामुळे राणे हे आपला निर्णय बदलतील अशी शक्यता होती. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी पक्षातच आहे. श्रेष्ठींचे म्हणणे मी ऐकले आहे. मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही. असे असले तरी मी सोमवारी मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे, असे राणे यांनी कोकण दौऱ्यावर निघण्याच्यावेळी सांगितले.
मी कोकण दौऱ्यावर जात आहे. जनतेशी संवाद साधणार आहे. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. दौऱ्याच्या आधी शेवटी काय निर्णय घेणार, असा प्रश्न सुरुवातीला विचारु नका, असे सांगून राणे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आज सकाळी निघालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.