www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने सलामी दिली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झालं आहे.
पुढील 24 तासांत कोकणात पाऊस सर्वत्र धुमशान घालणार आहे.
मच्छीमारांना मात्र समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नानोक चक्रीवादळामुळे मान्सून सक्रीय झाला आहे. केरळात पोहोचलेला मान्सून आता पुढे सरकला आहे.
मॉन्सूनचा आतापर्यंतचा प्रवास
18 मे - अंदमान - दरवर्षी 20 मे ला अंदमानात पोचणारा मॉन्सून यंदा दोऩ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला
2 जून - अरबी समुद्र - मात्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनची कोणतीहा प्रगती झाली नाही
6 जून - केरळ - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण झाल्याने नेहमी 1 जूनला केरळात पोहचणारा मान्सून तब्बल पाच दिवस उशीरा दाखल झाला.
11 जून - गोवा आणि कोकण - पाच ते सात जून दरम्यान कोकणात पोहचणारा मन्सून तब्बल एक आठवडा उशीरा कोकणात दाखल झाला असला तरी नानौक चक्रीवादळाच्या प्रभावामुळे त्याचं राज्याच्या इतर भागात मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता आहे
त्यामुळे 10 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पोहचणारा मान्सून अधिक उशीरा पोहोचण्याची चिन्ह आहेत. हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार दरवर्षी 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनची हजेरी लागते. यंदा मात्र हवामानाच्या परिस्थिती आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ यामुळे मन्सूनची पुढील वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांच लक्ष लागलयं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.