कोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी

 रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.

Updated: Jul 15, 2014, 12:57 PM IST
कोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी title=

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.

वादळ आणि मुसळधार होत असलेल्या पावसामुळे किनारपट्टी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. तर सिंधुदुर्गात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेलेचार दिवस सिंधुदुर्गात पाऊस सुरु आहे. आज पहाटे पासून पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्गात प्रशासनाने हाय अलर्ट चा इशारा दिला आहे जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३० मिमी पाऊस झालाय.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे राजापूर तालुक्यात मौजे ताम्हाणे जांभुळवाडी येथील अडीच वर्षाची बालिका श्रेया सचिन सरदेसाई हीचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 64.39 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीये. लांजा आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. लांजा तालुक्यात १२०.८० मिलिमीटर तर राजापूर तालुक्यात ११९.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. येत्या ४८ तासात कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

सिंधुदुर्गात पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरु आहे पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे गेलेचार दिवस सिंधुदुर्गात पाऊस सुरु आहे आज [पहाटे पासून पावसाचा जोर वाढला आहे कणकवलीमधील खारेपाटण भागातील घोडेपाथर भागात रस्त्यावर आहे तर कुडाळ माणगाव भागातही पातळी वाढली आहे.

सिंधुदु्र्गात प्रशासनाने 'हाय अलर्ट'चा इशारा दिला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३० मिमी पाऊस झाला आहे. वैभववाडीमध्ये सर्वाधिक १६५ मिमी तर कुडाळ ला १५८ मिमी पाऊस झाला आहे जिल्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक नदी दुथडीभरून वाहत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.