मुंबई : काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे.
राणे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी न लागल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार की थेट काँग्रेस सोडणार याची उत्सुकता लागली आहे. राणे कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्यापुढे भाजप किंवा राष्ट्रवादीचा पर्याय आहे.
कोकणात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची राणेंनी तयारी केली आहे. या दौ-यात जनमताचा कानोसा घेऊन राणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.