Jyotish Shastra: हिंदू धर्म शास्त्रामध्ये काही अशा गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळं मानवाच्या आयुष्यावर त्याचे थेट परिणाम दिसून येतात. अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या काही लहानशा चुकाही नकारात्मक परिणाम करुन जातात असं ज्योतषविद्येमध्ये सांगण्यात आलं आहे. तुमची प्रत्येक कृती तुमच्या किंवा आप्तजनांच्या आयुष्यावर त्यांच्या भवितव्यावर प्रभाव पाडत असते. बऱ्याचदा या कृती चुकीच्या मार्गावर गेल्यामुळं चक्क घरातील भरभराटही निघून जाते. जसं, ज्योतिषविद्येमध्ये सांगितल्यानुसार काही गोष्टी दुसऱ्यांच्या हाती देऊ नयेत, अशानं लक्ष्मीची अवकृपा होते. (Jyotish Shastra dont keep these selective things on anyones palm)
- (Salt) मीठ कधीच कोणाच्या हातात देऊ नका. ही अतिशय अशुभ कृती आहे. असं केल्यास तुम्ही एखाद्या वादात अडकू शकता. त्यामुळं मीठ कायम एखाद्या वाटीत किंवा पात्रात द्या.
- बऱ्याचदा जेवण वाढताना लोक चपाती हातात घेऊन ती इतरांना देतात. पण, धर्म शास्त्रांनुसार हे अतिशय चुकिचं आहे. असं केल्यामुळं तुम्हाला संपत्तीशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- कोणालाही तुम्ही ओंजळीत पिण्यासाठी पाणी (Water) देताय, तर ही सवय मोडा. असं केल्यास तुमच्याकडे असणारं धन लयास जाईल. पुण्यही कमी होईल.
- कधी कोणी तुमच्याकडे मिरची (Chillie) मागितली तर त्यांना एखाद्या वाटी किंवा पात्रामध्ये मिरची द्या. थेट हातात मिरची दिल्यास कलह वाढतील.
- कोणी तुमच्याकडे रुमाल मागितल्यास तो थेट त्यांच्या हातात देऊ नका. कुठेतरी तो रुमाल ठेवा जिथून अपेक्षित व्यक्ती तो घेऊ शकेल. रुमाल थेट हातात दिल्यास आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागेल.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)