नाशिक : थंडीचा जोर सर्वत्र वाढताना दिसतोय. नाशिक, पुण्यातही थंडीचा जोर वाढत चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा ८.४ अंश सेल्सिअसवर आला आहे. नाशिकचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला तर, द्राक्षांना फटका बसू शकतो, द्राक्षाचा फुगवटा कमी होऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईतही थंडी वाढत चालली आहे, मात्र थंडीचा फारसा प्रभाव दिसून येत नाहीय.