सोलापूर : सोलापूरच्या संवेदनशील असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी नेत्याचा खून झाल्याने येथे कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या खूनामुळे येथे निवडणुकीला गालबोट लागले आहे.
दक्षिण सोलापूर पंचायत समिती राष्ट्रवादीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने नेते कटारे हे विरोधी पक्षाचा प्रचार करीत होते, असे बोलले जात आहे. मात्र, हा राजकीय वैमनस्यातून आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचे म्हटले आहे. हा खून झाल्याने गावकऱ्यांनी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय.
गुरुनाथ कटारे हे संध्याकाळी प्रचार संपवून शेतातल्या वस्तीवर जाताना दोन अज्ञात व्यक्तीनी बंदूक आणि तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्लायत कटारे हे जागीच झाले, असे सांगण्यात आले.
कटारे हे रात्री घरी जात असताना हा हल्ला झालाय. मात्र हा हल्ला कशातून झाला आहे, याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.